सिव्हिलचे शिपाई, वॉर्डबॉय आता बहुउद्देशीय सहाय्यक होणार – Civil Ward boy Assistant
Civil Ward boy Assistant – शासकीय रुग्णालयात नोकरी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाचा अपडेट जाहीर झाला आहे. शासकीय रुग्णालयांत व इतर कार्यालयात काम करणाऱ्या वर्ग ४ कर्मचाऱ्यांना शिपाई, हमाल, मजदूर अथवा सफाईगार अशा नावांनी संबोधले जात होते. मात्र आरोग्य विभागाने ऐतिहासिक निर्णय घेत गट ‘ड’ मधील ३६ पदांचे एकत्रीकरण केले असून, या सर्वांना आता ‘बहुउद्देशीय सहाय्यक’ हे नवीन आणि मानाचे पदनाम दिले आहे. राज्य शासनाने विविध कामांचे एकत्रीकरण करुन संवर्ग संख्या कमी करण्याचे व मल्टीटास्किंगचे धोरण स्वीकारले आहे. मदतनीस, स्वच्छक, शिपाई, रुग्णपट वाहक, पंच परिचर, लेदर वर्कर, वेष्ठक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, कक्षसेवक, परिचर, आरोग्य परिचर, नर्सिंग ऑर्डरली, आया, ANM, सर्व्हन्ट, प्रयोगशाळा स्वच्छक, अंधारखोली परिचर, क्ष-किरण परिचर, दंत सहाय्यक, पुरुष सेवक, वाहन स्वच्छक, लस टोचणी परिचर, दूरध्वनी परिचर, हमाल, मजदूर, पंच मॅकेनिक, लाँड्री चालक, पाळणा चालक, संदेश वाहक अशी विभागणी त्रास दायक ठरत होती.
पुढे काय? कामात येणार आता लवचिकता
चतुर्थश्रेणी, शिपाई, हमाल, मजदूर, किंवा स्वच्छक अशा नावांनी हाक मारण्याऐवजी आता या सर्व कर्मचाऱ्यांना सहाय्यक म्हणून ओळख मिळणार आहे. या नावाने कर्मचाऱ्यांच्या कामांमध्ये दुजाभाव होणार नाही. त्यांना अपमानास्पद वाटणार नाही. कामात लवचिकता येणार, रुग्णालयातील गरजेनुसार कोणत्याही वॉर्डात अथवा विभागात या कर्मचाऱ्यांची सेवा तत्काळ उलब्ध करुन देणे प्रशासनाला सोपे होणार.
पदांची समान शैक्षणिक अर्हता व वेतनश्रेणी?
शासन सेवेत ड संवर्गातील ३६ पदांची शैक्षणिक अर्हता आणि वेतनश्रेणी १५,००० ते ४७,६०० समान असल्याने प्रशासनाने सुलभतेसाठी हे एकत्रीकरण केले. या निर्णयाने या सर्व पदांचा मानसन्मान वाढणार आहे. १६ ऑक्टोबरपासून हा निर्णय राज्यात लागू केला आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पुढे काय?
कामात येणार आता लवचिकता
पदांची समान शैक्षणिक अर्हता व वेतनश्रेणी?
शासन सेवेत ड संवर्गातील ३६ पदांची शैक्षणिक अर्हता आणि वेतनश्रेणी १५,००० ते ४७,६०० समान असल्याने प्रशासनाने सुलभतेसाठी हे एकत्रीकरण केले. या निर्णयाने या सर्व पदांचा मानसन्मान वाढणार आहे. १६ ऑक्टोबरपासून हा निर्णय राज्यात लागू केला आहे.