भारतीय रेल्वेत ५९० पदांची बंपर भरती! जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा अन् परीक्षा पद्धती – Indian Railway New Jobs
Indian Railway New Jobs – मित्रांनो, एक महत्वाचा भारतीय रेल्वेत वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती मंडळाकडून नर्सिंग सुपरिटेंडंट, फार्मासिस्ट, लॅब असिस्टंट, रेडियोग्राफर यांसह ५९० विविध पॅरामेडिकल पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. १५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेच्या विविध विभागांमध्ये पॅरामेडिकल संवर्गात तब्बल ५९० रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती रेल्वे भरती मंडळामार्फत (RRB) होत आहे. या भरतीद्वारे आरोग्य क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे.
RRB Paramedical Bharti 2026 Schedule: रेल्वे भरती प्रक्रियेचे वेळापत्रक
- ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात: १५ सप्टेंबर २०२६
- अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत: १४ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
- अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख: १६ ऑक्टोबर २०२६
- अर्जात दुरूस्तीसाठीचा वेळ: १७ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर २०२६
Railway Bharti Criteria: आरआरबी भरती २०२६ मधील प्रमुख पदे आणि शैक्षणिक पात्रता
१. नर्सिंग सुपरिटेंडंट (३६५ पदे): जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी (जीएनएम) किंवा बीएससी नर्सिंग.
२. फार्मासिस्ट (११८ पदे): फार्मसी मधील पदवी (B.Pharm) किंवा डीफार्म
३. हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड II (४३ पदे): बीएससी आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा.
४. लॅब असिस्टंट ग्रेड II (३१ पदे): १२ वी (सायन्स) आणि संबंधित डिप्लोमा.
५. रेडियोग्राफर/एक्स-रे तंत्रज्ञ (२५ पदे): १२ वी (सायन्स) व रेडियोग्राफी डिप्लोमा.
६. याशिवाय डायलिसिस टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, ऑप्टोमेट्रिस्ट आणि ऑडिओलॉजिस्टच्या पदांचा समावेश आहे.
विविध पदांनुसार उमेदवारांचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे (वय गणना ०१ जानेवारी २०२७ रोजी केली जाईल). सरकारी नियमानुसार एससी/एसटी उमेदवारांना ५ वर्षे, ओबीसी-एनसीएल उमेदवारांना ३ वर्षे तर दिव्यांग उमेदवारांना १० ते १५ वर्षांपर्यंत वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. प्रत्येक पदासाठी संबंधित वैद्यकीय मानके (बी१, सी१, सी२) उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. उमेदवारांची निवड संगणकावर आधारित परीक्षेच्या (सीबीटी) गुणवत्तेवर केली जाईल. परीक्षा १०० गुणांची असून त्यामध्ये १०० वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. यासाठी ९० मिनिटांचा वेळ दिला जाईल. परीक्षेमध्ये ७० प्रश्न विषयाशी संबंधित आणि ३० प्रश्न सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य विज्ञानावर आधारित असतील. चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण कापले जातील. सर्व उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ५०० रुपये आहे (सीबीटी दिल्यानंतर ४०० रुपये बँक खात्यात परत केले जातील). महिला, एससी, एसटी, अल्पसंख्याक, ईबीसी, दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी शुल्क २५० रुपये आहे, जे सीबीटी परीक्षेनंतर पूर्ण परत केले जाईल.