आपले नाव पहा यादीत-लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वी मिळणार ३ हजार रुपये? दोन हप्ते एकत्र मिळणार! – Ladki Bahin Diwali Payment 3000 Rupees
Ladki Bahin Diwali Payment 3000 Rupees – महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे लाडकी बहीण योजना! तर भगिनींनो, माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या लाडक्या बहीणींना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांचे प्रत्येकी १,५०० रुपये असे एकूण ३ हजार रुपये महिलांच्या खात्यात एकत्र जमा करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा सन्मान निधी थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटीच्या माध्यमातून दिला जातो. ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर लाभार्थी महिलांचे लक्ष आता सप्टेंबर व ऑक्टोबरच्या हप्त्याकडे लागले आहे. दिवाळी खरेदी, किराणा आणि घरगुती खर्च वाढत असल्याने या महिलांना या निधीची प्रतीक्षा आहे. सणापूर्वी रक्कम जमा झाल्यास महिलांना मोठा आर्थिक आधार मिळू शकतो. त्यामुळे सरकारकडून लवकरच हप्त्याच्या वितरणाबाबत निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या योजनेचा लाभ २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दिला जातो. दरम्यान, ई-केवायसी आणि पात्रतेच्या पडताळणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत बदल झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे महिलांनी हप्ता जमा झाल्याची माहिती अधिकृत माध्यमांतून तपासावी. सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे दिवाळीपूर्वी मिळणार की स्वतंत्रपणे वितरित होणार, हे सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये जमा केले जातात. या आर्थिक मदतीमुळे महिलांना घरखर्च आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी हातभार लागतो. मात्र, सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्याने लाभार्थी महिलांचं लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागलं आहे. दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पैसे नेमके कधी मिळणार, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र जमा झाल्यास पात्र महिलांच्या खात्यात एकूण ३,००० रुपये येऊ शकतात. दिवाळीच्या खरेदीसाठी आणि घरातील इतर गरजा भागवण्यासाठी या रकमेचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळण्याची अपेक्षा महिला व्यक्त करत आहेत. मात्र, दोन्ही हप्ते एकत्र देण्याबाबत सरकारने अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. या संदर्भात जिल्हा निहाय यादी अद्याप जाहीर होणार असून आपल्या जिल्ह्याचा अधिकृत संकेतस्थळावर आपण लवकरच याद्या बघू शकाल.
लाडकी बहीण अधिकृत संकेतस्थळाची आणि पूर्ण माहितीची लिंक
तसेच महत्वाचे म्हणजे, ई-केवायसी आणि पात्रतेच्या पडताळणीदरम्यान काही महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे संबंधित महिलांनी आपली पात्रता आणि बँक खात्याची स्थिती तपासून घ्यावी. सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हप्ते एकत्र मिळणार का, तसेच पैसे खात्यात कधी जमा होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.