NMMC महापालिकेची सरळसेवा पदभरती परीक्षा पूर्ण; १८,९३० उमेदवार मैदानात.. – NMMC Exam Results
NMMC Exam Result, Answer Key 2026
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘सरळसेवा भरती २०२५-२६’ अंतर्गत घेण्यात आलेली ऑनलाइन स्पर्धा परीक्षा मंगळवारी (२२ जुलै) कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीतपणे पूर्ण झाली. दोन दिवसांत सहा संवर्गांतील ३६ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली असून, काटेकोर नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय देखरेखीमुळे संपूर्ण प्रक्रिया सुव्यवस्थित पार पडल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील पवई येथील परीक्षा केंद्रांवर दोन सत्रांत परीक्षा घेण्यात आली. सकाळी ९ ते ११ या सत्रात ५८८, तर दुपारी १ ते ३ या सत्रात ४२२ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी एकूण १,०१० उमेदवार परीक्षेला उपस्थित होते. यापूर्वी सोमवारी (२१ जुलै) सहा जिल्ह्यांतील १३ केंद्रांवर तीन सत्रांत परीक्षा घेण्यात आली होती. दोन दिवसांच्या या प्रक्रियेत तीन संवर्गांतील १३ पदांसाठी नियोजित परीक्षा पूर्ण झाली. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा .
महापालिकेच्या या भरती प्रक्रियेसाठी सहा संवर्गांतील ३६ पदांसाठी एकूण १८ हजार ९३० अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले होते. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग-१ दर्जाचे आठ समन्वय अधिकारी आणि १३ केंद्र निरीक्षक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या अधिकाऱ्यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी संबंधित केंद्रांची पाहणी करून व्यवस्थेची खातरजमा केली होती. परीक्षेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ऑनलाइन परीक्षेच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या मान्यतेने सर्व परीक्षा कक्षांमध्ये मोबाईल जॅमरची व्यवस्था करण्यात आली होती. नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली कोणीही आर्थिक मागणी करत असल्यास उमेदवारांनी तत्काळ स्थानिक पोलिसांकडे तक्रार करावी, तसेच अफवा किंवा आमिषांना बळी न पडता भरतीसंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ आणि अधिकृत समाजमाध्यम खात्यांवरील माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
nmmc.gov.in NMMC Answer Key 2026 Overview
Dear Friends As ypu Know, Earlier Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) had launched the recruitment drive for various posts including Junior Engineer, Technician, Wireman, Account Clerk, ANM, Wardboy, Typist and others. To help candidates quickly understand the key highlights of the recruitment drive, we’ve shared an overview of the same-
| Particulars | Details |
| Organization | Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) |
| Post Name | Junior Engineer, Technician, Wireman, Account Clerk, ANM, Wardboy, Typist and others |
| Advt. No. | Bharti 2026 |
| Exam Mode | Computer-Based Test (Online Exam by ) |
| Exam Date | २१ जुलै, २०२६ व दि.२२ जुलै, २०२६ |
| Answer Key status | Published Download From given Link |
| Official Website | https://www.nmmc.gov.in/ |