Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » पुणे जिल्हा सत्र न्यायालयात ४०६ पदे रिक्त!! । Pune District Court Bharti 2026
Last Updated:

पुणे जिल्हा सत्र न्यायालयात ४०६ पदे रिक्त!! । Pune District Court Bharti 2026

Pune District Court Bharti 2026

पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात मंजूर असलेल्या १९३३ पदांपैकी १५२७ पदांवर कर्मचारी कार्यरत असून, ४०६ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक, शिपाई आणि बेलिफांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून, परिणामी समन्स बजावण्यापासून ते न्यायालयाचे आदेश तयार करण्यापर्यंतच्या अनेक कामांना अडथळे येत आहेत. त्याचा फटका न्यायाच्या प्रतीक्षेत पक्षकारांना बसत आहे. असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी पुणे न्यायालयातील मंजूर व प्रत्यक्ष कार्यरत पदसंख्येची माहिती मागितली होती. त्यावर जिल्हा न्यायालयाच्या जन माहिती अधिकाऱ्यांनी ३० जून २०२६ अखेर मंजूर पदे व कार्यरत मनुष्यबळाची माहिती दिली आहे. या मुळे आता नवीन पदभरती प्रक्रिया कधी सुरु होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच सुरु झाली तर पुण्यातील उमेदवारांना नोकरीची मोठी संधी मिळू शकते सोबतच कामाचा ताण सुद्धा कमी होईल. त्या मुळे हि भरती लवकर राबवावी हि मागणी सर्व स्तरातून होत आहे.

Pune District Court Bharti 2026

या रिक्त पदां मध्ये न्यायालयात निबंधकापासून अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, न्यायालयाच्या आकृतीबंधाबाबत उच्च न्यायालय व सरकारमधील पत्रव्यवहाराची माहिती प्रशासकीय विचारली असता, अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे प्रशासनाने उत्तर दिले आहे. मुख्य बेलिफ व अन्य बेलिफांची मंजूर ४९ पदे रिक्त आहेत. वरिष्ठ लिपिकांची ८२; तर कनिष्ठ लिपिकांची ९६ पदे रिक्त आहेत. शिपायांची ६२ पदे रिक्त असल्याने कामकाजाचा भार अन्य कर्मचाऱ्यांवर पडत आहे. निबंधकाचे एक, स्टेनोग्राफरची तिन्ही ग्रेड मिळून ५५, अधीक्षक व सहायक अधीक्षकांची एकूण २८ आदी पदे रिक्त आहेत.

Advertisement

Pune District Court Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या
लघुलेखक (श्रेणी-3) –पदे
कनिष्ठ लिपिक –पदे
शिपाई/हमाल –पदे

Salary Details For Pune District Court Recruitment 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
लघुलेखक (श्रेणी-3) एस-14: (38600-122800)
कनिष्ठ लिपिक एस-6 : (19900-63200)
शिपाई/हमाल एस-1 : (15000-47600)

How To Apply For Pune District Court Notification 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

Advertisement