Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » १२ वी पास महिलांसाठी १ लाख अंगणवाड्यांमध्ये मोठी भरती जाहिरात आली; जाणून घ्या सर्व माहिती! – WCD Maharashtra Anganwadi Mega Bharti
Last Updated:

१२ वी पास महिलांसाठी १ लाख अंगणवाड्यांमध्ये मोठी भरती जाहिरात आली; जाणून घ्या सर्व माहिती! – WCD Maharashtra Anganwadi Mega Bharti

WCD Maharashtra Anganwadi Mega Bharti – महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हि बातमी अख्या राज्यभरातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यभरात एकूण १,०१५ सेविका आणि ३,९२८ मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक भरती होणार आहे. महिला व बालविकास विभागामार्फत जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये १७६ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये ६१ अंगणवाडी सेविका आणि ११५ मदतनीस पदांचा समावेश आहे. तसेच मित्रांनो, राज्यातील १ लाख १० हजार ६६४ अंगणवाड्यांमधील १०१५ सेविका आणि ३९२८ मदतनीस पदांची भरती होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये ११५ मदतनीस व ६१ सेविकांची भरती केली जात आहे. त्यानुसार, पहिल्यांदा सध्या कार्यरत मदतनीसमधून सेवाज्येष्ठतेनुसार सेविका पदासाठी पात्र असलेल्या महिलांची यादी प्रसिद्ध होईल. त्यांना सेवाज्येष्ठतेनुसार सेविका म्हणून संधी मिळणार आहे.  या भरती अंतर्गत, इच्छुक महिला उमेदवारांकडून २० ते ३१ जुलै या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच, २७ ऑगस्ट रोजी अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. या भरतीमध्ये निवड झालेल्या अंगणवाडी सेविकांना दरमहा १३ हजार रुपये, तर मदतनीसांना ७ हजार ५०० रुपये मानधन दिले जाणार आहे.शासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ३ ते ७ ऑगस्ट दरम्यान अर्जांची छाननी करून प्राथमिक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. १० ते १२ ऑगस्ट या कालावधीत पडताळणी समितीकडून गुणवत्ता यादीची तपासणी केली जाईल. त्यानंतर १३ ते २६ ऑगस्ट या कालावधीत हरकती आणि आक्षेप नोंदविता येतील. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २७ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे पाठवण्यात येतील.

WCD Maharashtra Anganwadi Mega Bharti

तसेच महत्वाचे म्हणजे अंगणवाडी मदतनीस पदासाठी महिला उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) आवश्यक राहील. शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराने शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रांच्या व गुणपत्रिकांच्या सत्यप्रती सक्षम प्राधिकाऱ्यांकडुन सांक्षाकित केलेल्या सोबत जोडाव्यात. ज्या नगर परिषद/ नगर पंचायत/ नगर पालिका क्षेत्रात अंगणवाडी मदतनीस पद रिक्त आहे त्या नगरपरिषद/नगरपंचायत/नगरपालिका कार्यक्षेत्रातील रहीवासी असलेल्या उमेदवारांना पांत्र समजण्यात येईल स्थानिक रहिवाशी असले बाबत शासनाने निश्चित केलेला पुरावा सोबत जोडने आवश्यक आहे (आधार कार्ड, रेशन कार्ड, तहसिलदार यांचे डोमासाईल सर्टीफिकेट किंवा रहिवाशी प्रमाणपत्र (तलाठी) सत्य प्रत जोडावी) तसेच उमेदवारांनी संबधीत नगर परिषद/नगर पंचायत क्षेत्रातील रहिवाशी असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र सोबत जोडण्यात यावे. जाहिरात प्रसिध्दीच्या दिनांकास किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्षे आणि विधवा उमेदवारासाठी वयोमर्यादा कमाल 40 वर्षे राहिल. (जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10 वी प्रमाणपत्र जोडावे) 30 जानेवारी 2025 शासन निर्णयात नमुद केल्या प्रमाणे उमेदवाराच्या शैक्षणिक गुण पत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे 80 गुण (१२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, डी एड, बी एड व शासकिय मान्यता संस्थेचे संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MSCIT) अथवा शासनाने वेळोवेळी समकक्ष ठरवीलेला संगणक अभ्यासक्रम पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र यांचे एकत्रीत कमाल 80 गुण) व अतिरिक्त 20 गुण ( विधवा /अनाथ -10 गुण, अनुसुचित जाती / जमाती -05 गुण, इतर मागास प्रवर्ग/विमुक्त जाती /भटक्या जमाती /आर्थिक दुष्टया दुर्बल /विशेष मागास प्रवर्ग/ सामाजिक व शैक्षणीक दृष्या मागास प्रवर्ग 03 गुण, अंगणवाडी सेविका/ मिनी सेविका / मदतनिस पदाचा 02 वर्षाचा अनुभव असल्यास – 05 गुण आहेत. अधिक माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात बघावी.

३ ते ७ ऑगस्टपर्यंत अर्जांची छाननी होऊन प्राथमिक यादी तयार होईल. १० ते १२ ऑगस्ट दरम्यान पडताळणी समितीच्या माध्यमातून गुणवत्ता याद्यांची पडताळणी होणार आहे. या यादीवर कोणाची हरकत अथवा आक्षेप असल्यास, त्यांना १३ ते २६ ऑगस्टपर्यंत हरकती व आक्षेप नोंदविता येतील. त्यानंतर २७ ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊन निवडलेल्या महिलांना नियुक्तीपत्रे दिली जातील, असे शासनाने वेळापत्रक जाहीर केले आहे.

Education Details

अंगणवाडी सेविकांवर बालकांचे पूर्वप्राथमिक शिक्षण, गरोदर महिलांच्या आरोग्याची नोंद, पोषण आहार वितरण, बालकांच्या आरोग्याची देखरेख, पोषण ट्रॅकरवर माहिती नोंदविणे आणि शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असते. तर मदतनीस बालकांच्या शिक्षणात सहाय्य करणे, अंगणवाडीचे दैनंदिन कामकाज, वजन व उंचीच्या नोंदी ठेवणे आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीत सेविकांना मदत करणे हे काम असेल. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, बार्शी, वैराग, करमाळा, माढा, टेंभुर्णी, माळशिरस, अकलूज, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, पंढरपूर, सांगोला, कोळा आणि दक्षिण सोलापूर या प्रकल्पांमध्ये भरती होणार आहे. त्यामुळे सरकारी सेवेत काम करण्याची इच्छा असलेल्या पात्र महिलांसाठी ही भरती मोठी संधी आहे.